‘ पबजी ’ च्या मायाजाळात युवा पिढी तरुणांमध्ये ‘ पबजी ’ या आॅनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हिंसक प्रवृत्तीला खतपाणी घालणारा हा गेम जीवघेणा ठरू लागला आहे. या गेमने शाळा-कॉलेजांपासून ते कॉर्पोरेट जगतातही धुमाकूळ घातला आहे. या गेमवर बंदी घालावी , अशी मागणी आता होऊ लागली आहे. एका 11 वर्षीय मुलाने थेट पंतप्रधानांनाच यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यामुळे पबजी पुन्हा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘ परीक्षा पे चर्चा ’ या कार्यक्रमात या गेमचा उल्लेख केला होता . एका आईने आपला मुलगा ऑनलाईन गेममुळे अभ्यास करत नसल्याचे म्हटले होते . तेव्हा पंतप्रधान मोदींनी , ‘ पबजीवाला है क्या ?’ असे विचारले होते . ‘ पबजी ’ गेम खेळू देत नाहीत म्हणून मुलांना आई-वडिलांना भोसकणे , अपटेडेट वर्जनसाठी नवीन मोबाईल देत नाहीत म्हणून तरुणाची आत्महत्या करणे , अशा एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांनी आता पालकवर्गही धास्तावला आहे. कॉलेजीयन्समध्ये पबजीचे वेड पाहून शिक्षक-पालकही चिंतेत पडलेले आहेत. पबजीमुळे तरुणांमध्य...
Posts
- Get link
- X
- Other Apps
‘इसिस’च्या रडारवर महाराष्ट्र! रायायनिक हल्ला करून करायचे होते हत्याकांड दहशतवादविरोधी पथकाने उधळला डाव ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना आता भारतातही आपले हातपाय पसरू पाहात आहे. हिंदुबहुल लोकसंख्या असलेल्या भारतात त्यांना दहशतवादी कृत्ये करायची आहेत. त्यासाठी ते संधीच्या शोधात आहेत. नवनवीन क्लृप्त्या योजून ते आपल्या कामाला अंजाम देऊ पाहात आहेत. मात्र अद्याप तरी त्यांना त्यांच्या कामात यश आलेले नाही. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेला जगभर आपले जाळे पसरायचे आहे. सध्या ही संघटना काही देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. कित्येक निष्पाप जीवांच्या हत्येचे पातक त्यांच्या माथी आहे, पण त्याची त्यांना बिलकूलही फिकीर नाही. उलट त्यांचा हा नरसंहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यातूनच भारतातील काही माथेफिरू तरुणही त्यांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. नुकतीच संशयित दहशतवादी म्हणून अटक केलेले दहा जण तसेच याआधीही अनेकदा पकडलेले संशयित दहशतवादी हे त्यापैकीच आहेत. त्यांना ‘इसिस’ या संघ...
- Get link
- X
- Other Apps
शिराळेवासीयांची ‘गावपळण’ मी तळकोकणातला. सांगुळवाडी हेसह्याद्रीच्या कुशीत वसलेलेमाझे गाव. आमचे तालुक्याचे ठिकाण वैभववाडी. वैभववाडीवरून ८-९ कि.मी.वर आमचेघर आहे. आमच्यापेक्षा आणखी थोडे पुढे म्हणजेच वैभववाडीपासून जवळपास १५ कि.मी.वर एक शिराळे नावाचे गाव वसलेले आहे. शिराळे गावातील ‘पाटील’ लोक हे आमचेपाहुणे. त्यामुळे आमचे या गावात जाणे-येणे सातत्याने असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही मोजक्या गावांत गावपळण होते, त्यात या शिराळे गावाचाही समावेश आहे. यंदा मंगळवार, दि. १५ जानेवारीपासून या गावची सुरू झालेली आहे. त्यामुळे आता शिराळे हे गाव सुने-सुने झाले आहे. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे, मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेत या परंपरा टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहे. गावपळण ही एक अंधश्रद्धा आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र संबंधित गावक-यांना तसे अजिबात वाटत नाही. ते आपल्या या परंपरांचा आनंद निरंतर घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे या गावाव्यतिरिक्त तळकोकणात आणखीही काही गावांची ग...
- Get link
- X
- Other Apps
मुंबई , नवी मुंबई , ठाण्यात होतेय कोट्यवधींची फसवणूक आजकाल लोकांना झटपट पैसा हवा आहे... मेहनत कमी आणि पैसा जास्त मिळावा , अशी अपेक्षा प्रत्येक जण करताना दिसत आहे. लोकांची ही मानसिकता ओळखून काही महाभाग गंडा घालण्याचे आपले नवनवीन फंडे वापरताना दिसतात आणि भोळेभाबडे लोकही त्यांच्या फंड्यांमध्ये आपसूकच फसतात. मुंबई , नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या महानगरांमध्ये अलीकडच्या काळात अशा फसवणुकीच्या घटना वारंवार घडताना दिसत असून फसवणूक झाल्यानंतर लोक पोलीस ठाण्याची पायरी चढत असल्याने पोलिसांचीही अशा प्रकरणांचा छडा लावताना कसोटी लागत आहे. मुंबईमध्ये एकेकाळी शेरेगर प्रकरण खूपच गाजले होते. अगदी अल्पावधीत पैशांची दामदुप्पट करण्याचा फंडा या महाभागाने अवलंबला होता. असंख्य लोक त्याच्या नादाला लागले होते. सुरुवातीला लोक पैसे गुंतवत असल्याने काही लोकांना त्याचा फायदा झाला खरा , मात्र तोच दामदुप्पट झालेला पैसा अधिक पैशांच्या लालसेने पुन्हा त्याच ठिकाणी गुंतवल्याने असंख्य लोकांचे गुंतवलेले सर्वच पैसे डुबले होते. ही घटना तशी ताजी असतानाच अशाच प्रकारच्या गुंतवणुकीवर दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्...
- Get link
- X
- Other Apps
नेटबँकिंग-पेटीएमद्वारे पैसे स्वीकारण्याचा फंडा! नवोदित कलाकारांना ठकसेनांचा गंडा!! - जगदीश भोवड मुंबईसारख्या शहरात लोकांना गंडा घालण्याचे, वाममार्गाने पैसे कमावण्याचे धंदे सातत्याने घडताना दिसत आहेत. यापैकी सर्वच गुन्ह्यांना वाचा फुटते असे नाही. आपण फसवले गेलो, आपली नाचक्की झाली, हे जगजाहीर होऊ नये यासाठी अनेक लोक आपल्यावर गुदरलेला प्रसंग पोलिसांना सांगतच नाहीत. त्यामुळे असे असंख्य गुन्हे उघडकीस येतच नाहीत. मात्र काही लोक पोलिसांकडे जाण्याचे धाडस करतात आणि पोलिसांनी मनावर घेतले, तर कोणताही गुन्हा उघड होतोच होतो, असाही अनुभव आहे. मुंबईमध्ये ‘युनिट नं. ९’ नावाची गुन्हे अन्वेषण विभागाची एक शाखा आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज पोलीस अधिकाºयांनी तपासी अधिकारी म्हणून काम करताना आपली छाप पाडली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनीही याच शाखेत असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. आता या युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते महेश देसाई. साळसकर यांच्याच तालमीत तयार झालेले महेश देसाई हेही आता आपली छाप पाडताना दिसत आहेत. मुंबईमध्ये विविध प्रकारची आ...