शिराळेवासीयांची ‘गावपळण’
मी तळकोकणातला. सांगुळवाडी हेसह्याद्रीच्या कुशीत वसलेलेमाझे गाव. आमचे तालुक्याचे ठिकाण वैभववाडी. वैभववाडीवरून ८-९ कि.मी.वर आमचेघर आहे. आमच्यापेक्षा आणखी थोडे पुढे म्हणजेच वैभववाडीपासून जवळपास १५ कि.मी.वर एक शिराळे नावाचे गाव वसलेले आहे. शिराळे गावातील ‘पाटील’ लोक हे आमचेपाहुणे. त्यामुळे आमचे या गावात जाणे-येणे सातत्याने असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही मोजक्या गावांत गावपळण होते, त्यात या शिराळे गावाचाही समावेश आहे. यंदा मंगळवार, दि. १५ जानेवारीपासून या गावची सुरू झालेली आहे. त्यामुळे आता शिराळे हे गाव सुने-सुने झाले आहे.
महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे, मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेत या परंपरा टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहे. गावपळण ही एक अंधश्रद्धा आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र संबंधित गावक-यांना तसे अजिबात वाटत नाही. ते आपल्या या परंपरांचा आनंद निरंतर घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे या गावाव्यतिरिक्त तळकोकणात आणखीही काही गावांची गावपळण होत असते. मालवणात वायंगणी, आचरा आणि चिंदर, देवगड येथे मुणगे आदी गावांमध्ये ‘गावपळण’ होते.
शिराळे गावात सुमारे ४५० वर्षांपासून गावपळणीची परंपरा चालत आलेली आहे. गावपळणीच्या दरम्यान सडुरे गावच्या जंगलात शिराळे गावातील लोक आपला संसार थाटतात. गावपळणीदरम्यान लागणारा धान्य साठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन हे लोक गावाबाहेर जातात. आम्ही शाळेत असताना नेहमी शिराळे गावात जात असू आणि तेथील परंपरागत चालीरीतींचा आनंद घेत असू. शिराळे गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते, असे येथील गावकरी सांगतात. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे ‘वार्षिक’ समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोदेवाला कौल लावला जातो आणि देवाने हुकूम दिला तर गावकरी गावात परततात. नाहीतर आणखी काही दिवस त्यांचा मुक्काम वाढतो.
सडुरे गावच्या हद्दीमध्ये म्हणजेदडोबाच्या पायथ्याशी मोकळ्या माळरानावर झोपड्या बांधून शिराळेवासीय वास्तव्य करतात. गावपळणीच्या अगोदर एक दिवस आधी घरामध्ये गोड जेवण किंवा मांसाहारी जेवण करून बाहेर पडतात. ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात, तो दिवस गृहीत धरला जात नाही. कारण घरातील चुलीमध्ये विस्तव असतो. या गावपळणीमध्ये घरातील चिमुकल्यांसह वयोवृद्धही सहभागी होतात. गावपळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा झाडाखाली भरविली जाते. गावात गावपळणी दरम्यान एस.टी.बस सुध्दा जात नाही. गावपळणी दरम्यान जनावरे सडुरे गावच्या हद्दीत सोडून दिलेली असतात, मात्र ही जनावरेही शिराळे गावाच्या हद्दीत जात नाहीत, हे विशेष. संध्याकाळी ही सर्व जनावरे आपापल्या मालकांच्या झोपडीच्या ठिकाणी येतात. गावपळणीदरम्यान लगत असणा-या सुख नदीमध्ये झरा खोदून पाण्याचा वापर करतात. शिराळे गावात जेवढी घरे आहेत, ते सर्व एकाच ठिकाणी झोपड्या बांधून राहतात. एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या असतात. त्यामुळे दिवस-रात्र हे सर्व लोक एकत्र राहतात व गावपळणी दरम्यान गावक-यांमध्ये खेळी मेळीचे वातावरण दिसून येते.
गांगो देवाला कौल लावल्यानंतर देवाने हुकूम दिला, तर गावपळण केली जाते. गावपळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कुणीही गावात पाऊल ठेवत नाहीत. कारण या तीन दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे तीन दिवस गावात कोणाचाही आवाज होता कामा नये, याची प्रत्येक गावकरी काळजी घेतो. पहिले तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा ग्रामस्थ गावात जाऊन आपले घरदार पाहून येतात, पण गावात राहत नाहीत. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेरच राहतात.
गावभरणी केल्यानंतर काही दिवसात गावातील एका माळरानावर जत्रौत्सव भरवला जातो. या जत्रौत्सवामध्ये इतर गावातील लोक, पाहुणे, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आम्हीही पूर्वी अनेक वेळा या जत्रेचा आनंद लुटलेला आहे. शिराळेवासीयांचा आपल्या श्री देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत तीन दिवसानंतर हुकूम घेऊन गावात परततात. काही लोक गावपळण ही अंधश्रद्धा मानतात, मात्र तरीही आपली ही परंपरा समजून जंगलात काही दिवस एकोप्याने, एकदिलाने राहण्याचेलोक एक वेगळा आदर्श घडवताना आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. आपल्या परंपरा टिकवून ठेवणाºया या गावकºयांचे खरोखर कौतुक वाटते.

Comments
Post a Comment