‘पबजी’च्या मायाजाळात युवा पिढी
तरुणांमध्ये ‘पबजी’ या आॅनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हिंसक प्रवृत्तीला खतपाणी घालणारा हा गेम जीवघेणा ठरू लागला आहे. या गेमने शाळा-कॉलेजांपासून ते कॉर्पोरेट जगतातही धुमाकूळ घातला आहे. या गेमवर बंदी घालावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. एका 11 वर्षीय मुलाने थेट पंतप्रधानांनाच यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यामुळे पबजी पुन्हा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात या गेमचा उल्लेख केला होता. एका आईने आपला मुलगा ऑनलाईन गेममुळे अभ्यास करत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी, ‘पबजीवाला है क्या?’ असे विचारले होते.
‘पबजी’ गेम खेळू देत नाहीत म्हणून मुलांना आई-वडिलांना भोसकणे, अपटेडेट वर्जनसाठी नवीन मोबाईल देत नाहीत म्हणून तरुणाची आत्महत्या करणे, अशा एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांनी आता पालकवर्गही धास्तावला आहे. कॉलेजीयन्समध्ये पबजीचे वेड पाहून शिक्षक-पालकही चिंतेत पडलेले आहेत. पबजीमुळे तरुणांमध्ये वाढत चाललेली हिंसक वृत्ती लक्षात घेता मुंबई विद्यापीठानेही आता कॉलेज कॅम्पसमध्ये या गेमवर बंदी घालण्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. लवकरच बंदीच्या आदेशाचे पत्र कॉलेजांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हिंसक प्रवृत्ती वाढीस लावणारा ‘पबजी’ हा गेम नेमका काय आहे, हेही समजून घेणे गरजेचे आहे. ‘पबजी’ हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकट्य़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये जवळपास १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळत असतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो.
अशा प्रकारे तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर इतरांना मारले पाहिजे, अशा प्रकारचा संदेशच या गेममधून तरुणाईमध्ये जात आहे. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशिनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते. फेसबुक लॉगइनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात. या गेमचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाइव्ह चॅटिंगही करता येते. म्हणजे आधी एका सायबर कॅफेमध्ये जमून आरडाओरड करत काऊण्टर स्ट्राइक खेळला जायचा, तसेच आता फक्त या गेममुळे कुठूनही एकाच वेळेस ऑनलाइन बसून प्लॅनिंग करून हाणामारी करीत हा गेम खेळता येतो आणि जिंकता येतो.
हा गेम लोकप्रिय होण्याचे आणखी एक कारण म्हणजे लाइव्ह चॅटिंग. अर्थात या गेममध्ये हिंसा असल्याने हा गेम केवळ 18 वर्षांवरील मुलांसाठीच आहे, परंतु आता स्मार्टफोन वापरणारी सर्वच वयोगटांतील मुले हा गेम स्वत:च्या किंवा आई-बाबांच्या मोबाइलवरून खेळताना दिसतात. या गेममुळे मुलांमधील हिंसक वृत्ती वाढण्याची शक्यता असून त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, असं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या गेमचे तरुणांना, कॉलेजातील मुलांना एवढे व्यसन लागलेले आहे की, कॉलेजची मुले कॅम्पसमध्ये, एखाद्या रिक्षात बसून, बसस्टॉपवरही घोळक्याने जमून हा गेम खेळताना दिसतात. या गेमच्या वेडापायी मुलांच्या कॉलेजमधील हजेरीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या गेमच्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांची हिंसक वृत्ती वाढत असल्याने पालकांनी, शिक्षकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक बनलेले आहे. या गेममुळे होणाऱ्या घटना लक्षात घेता हा गेम अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने मुंबई विद्यापीठ या गेमवर बंदी घालण्याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
माणसाने काळाबरोबर चालले पाहिजे. इंटरनेटमुळे जग अत्यंत जवळ आले आहे. मोठ्या प्रमाणात लोक इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. ही समाधानाची बाब असली तरी त्याच वेळी इंटरनेटवर जे आॅनलाईन गेम उपलब्ध आहेत, त्यातून अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. आॅनलाईन गेममधील ‘पबजी’ या मोबाईल गेम्सने तर तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. पबजीच्या आहारी गेलेल्यांची संख्या खूपच जास्त आहे. मात्र या गेममुळे ज्या काही घटना घडत आहेत, ते पाहता आता या गेमला लोकांचा विरोधही वाढत चालला आहे.
या गेमवर बंदी घालावी यासाठी मुंबईतील एक अकरा वर्षांचा मुलगा उच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. अर्थात त्याच्या पालकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे, मात्र त्यातून या गेममुळे समाजातील युवापिढीत जे काही चुकीचे घडत आहे, त्यावर पुन्हा एकदा झगझगीत प्रकाश पडला आहे. या मुलाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या गेममुळे हिंसा, हल्ला आणि सायबर हल्ल्याला प्रोत्साहन मिळत आहे. मुंबईत राहणाऱ्या या मुलाचे नाव आहे अहद निजाम. त्याच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ‘पबजी’वर बंदी घातली पाहिजे आणि याबाबत महाराष्ट्र सरकारला आदेश दिले पाहिजेत, असे निजामने याचिकेत म्हटले आहे.
पबजी गेम 2017 मध्ये लॉन्च झाला होता. त्यानंतर अवघा वर्ष-दीड वर्षात या गेमची लोकप्रियता झपाट्याने वाढली. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत या गेमचीच क्रेझ दिसू लागली. या गेमवर जम्मू काश्मीरमध्येही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या गेममुळे मुलांवर वाईट परिणाम होतात असे या मागणी करणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते. कारण काही दिवसांपूर्वीच ‘पबजी’ खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस ‘पबजी’ खेळल्याने त्या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.
मुंबईतील या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने ‘पबजी’ वर बंदी आणा, अशी याचिका दाखल करण्यापूर्वी त्याने हीच मागणी करणारे एक पत्र केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही लिहिले होते. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटले होते. अखेर सरकारने दखल न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा खटखटवला आहे.
या गेममध्ये हिंसकपणा आहे यात आता काही नवल नाही. कारण अनेक व्हिडीओ गेम्समध्ये हिंसा असतेच. मात्र पबजीमुळे एक नवीनच समस्या उभी राहिली आहे. अनेक जण सध्या त्यांच्या मोबाइलवर रात्री जागरण करून हा गेम खेळताना दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणे अनेक पालकांना या गेमबद्दल पुरेशी माहितीही नाही. तसेच या गेममुळे अनेक मुले अनोळखी लोकांशी संवाद साधतात आणि त्यामधूनच पुढे अशाच अनोळखी लोकांकडून धमकावणे आणि माहिती चोरण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर घरी गेम खेळण्यासाठी बोलवलेली व्यक्ती भलतीच कोणी तरी असल्याचे प्रकारही घडले आहेत. या गेममध्ये लाइव्ह चॅट या पर्यायामुळे मुलं अनोळखी लोकांशी संवाद साधतात हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हा गेम खेळणाऱ्यांनी आपण कोणाशी संवाद साधतोय, आपली माहिती कोणाला देतोय याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे. पालकांनी आपला मुलगा काय करतो याबद्दल सतर्क राहणे आणि सुजाण मुलांनी माहिती देताना किंवा गेम खेळताना सतर्क राहणे हे दोनच उपाय सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत. दुसरे असे की, या गेममुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक मुले आपल्या पालकांशीही संवाद साधत नसल्याचे दिसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपुरी झोप. सर्वच वयोगटांतील मुले रात्री उशिरापर्यंत हा गेम खेळत असल्याने झोप कमी होते. त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवसाच्या दिनक्रमावर तर होतोच, शिवाय त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांनाही आमंत्रणच मिळते. त्यामुळे ‘पबजी’ या गेमवर लवकरात लवकर बंदी येणे अत्यंत आवश्यक आहे. तरच ‘पबजी’च्या मायाजाळात अडकलेली युवा पिढी वाचू शकेल. नाही का?

Comments
Post a Comment