Posts

Showing posts from February, 2019
‘ पबजी ’ च्या मायाजाळात युवा पिढी तरुणांमध्ये  ‘ पबजी ’  या आॅनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हिंसक प्रवृत्तीला खतपाणी घालणारा हा गेम जीवघेणा ठरू लागला आहे. या गेमने शाळा-कॉलेजांपासून ते कॉर्पोरेट जगतातही धुमाकूळ घातला आहे. या गेमवर बंदी घालावी ,  अशी मागणी आता होऊ लागली आहे. एका  11  वर्षीय मुलाने थेट पंतप्रधानांनाच यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यामुळे पबजी पुन्हा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील  ‘ परीक्षा पे चर्चा ’  या कार्यक्रमात या गेमचा उल्लेख केला होता .  एका आईने आपला मुलगा ऑनलाईन गेममुळे अभ्यास करत नसल्याचे म्हटले होते .  तेव्हा पंतप्रधान मोदींनी , ‘ पबजीवाला है क्या ?’  असे विचारले होते . ‘ पबजी ’  गेम खेळू देत नाहीत म्हणून मुलांना आई-वडिलांना भोसकणे ,  अपटेडेट वर्जनसाठी नवीन मोबाईल देत नाहीत म्हणून तरुणाची आत्महत्या करणे ,  अशा एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांनी आता पालकवर्गही धास्तावला आहे. कॉलेजीयन्समध्ये पबजीचे वेड पाहून शिक्षक-पालकही चिंतेत पडलेले आहेत. पबजीमुळे तरुणांमध्य...
‘इसिस’च्या रडारवर महाराष्ट्र! रायायनिक हल्ला करून करायचे होते हत्याकांड दहशतवादविरोधी पथकाने उधळला डाव  ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना आता भारतातही आपले हातपाय पसरू पाहात आहे. हिंदुबहुल लोकसंख्या असलेल्या भारतात त्यांना दहशतवादी कृत्ये करायची आहेत. त्यासाठी ते संधीच्या शोधात आहेत. नवनवीन क्लृप्त्या योजून ते आपल्या कामाला अंजाम देऊ पाहात आहेत. मात्र अद्याप तरी त्यांना त्यांच्या कामात यश आलेले नाही.  ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेला जगभर आपले जाळे पसरायचे आहे. सध्या ही संघटना काही देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. कित्येक निष्पाप जीवांच्या हत्येचे पातक त्यांच्या माथी आहे, पण त्याची त्यांना बिलकूलही फिकीर नाही. उलट त्यांचा हा नरसंहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यातूनच भारतातील काही माथेफिरू तरुणही त्यांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. नुकतीच संशयित दहशतवादी म्हणून अटक केलेले दहा जण तसेच याआधीही अनेकदा पकडलेले संशयित दहशतवादी हे त्यापैकीच आहेत. त्यांना ‘इसिस’ या संघ...