Posts

Showing posts from January, 2019
 शिराळेवासीयांची ‘गावपळण’ मी तळकोकणातला. सांगुळवाडी हेसह्याद्रीच्या कुशीत वसलेलेमाझे गाव. आमचे तालुक्याचे ठिकाण वैभववाडी. वैभववाडीवरून ८-९ कि.मी.वर आमचेघर आहे. आमच्यापेक्षा आणखी थोडे पुढे म्हणजेच वैभववाडीपासून जवळपास १५ कि.मी.वर एक शिराळे नावाचे गाव वसलेले आहे. शिराळे गावातील ‘पाटील’ लोक हे आमचेपाहुणे. त्यामुळे आमचे या गावात जाणे-येणे सातत्याने असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही मोजक्या गावांत गावपळण होते, त्यात या शिराळे गावाचाही समावेश आहे. यंदा  मंगळवार, दि. १५ जानेवारीपासून या गावची सुरू झालेली आहे. त्यामुळे आता शिराळे हे गाव सुने-सुने झाले आहे. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे, मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेत या परंपरा टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहे. गावपळण ही एक अंधश्रद्धा आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र संबंधित गावक-यांना तसे अजिबात वाटत नाही. ते आपल्या या परंपरांचा आनंद निरंतर घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे या गावाव्यतिरिक्त तळकोकणात आणखीही काही गावांची ग...
मुंबई , नवी मुंबई , ठाण्यात होतेय कोट्यवधींची फसवणूक आजकाल लोकांना झटपट पैसा हवा आहे... मेहनत कमी आणि पैसा जास्त मिळावा , अशी अपेक्षा प्रत्येक जण करताना दिसत आहे. लोकांची ही मानसिकता ओळखून काही महाभाग गंडा घालण्याचे  आपले नवनवीन फंडे वापरताना दिसतात आणि भोळेभाबडे लोकही त्यांच्या फंड्यांमध्ये आपसूकच फसतात. मुंबई , नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या महानगरांमध्ये अलीकडच्या काळात अशा फसवणुकीच्या घटना वारंवार घडताना दिसत असून फसवणूक झाल्यानंतर लोक पोलीस ठाण्याची पायरी चढत असल्याने पोलिसांचीही अशा प्रकरणांचा छडा लावताना कसोटी लागत आहे. मुंबईमध्ये एकेकाळी शेरेगर प्रकरण खूपच गाजले होते. अगदी अल्पावधीत पैशांची दामदुप्पट करण्याचा फंडा या महाभागाने अवलंबला होता. असंख्य लोक त्याच्या नादाला लागले होते. सुरुवातीला लोक पैसे गुंतवत असल्याने काही लोकांना त्याचा फायदा झाला खरा , मात्र तोच दामदुप्पट झालेला पैसा अधिक पैशांच्या लालसेने पुन्हा त्याच ठिकाणी गुंतवल्याने असंख्य लोकांचे गुंतवलेले सर्वच पैसे डुबले होते. ही घटना  तशी ताजी असतानाच अशाच प्रकारच्या गुंतवणुकीवर दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्...
नेटबँकिंग-पेटीएमद्वारे पैसे स्वीकारण्याचा फंडा! नवोदित कलाकारांना ठकसेनांचा गंडा!!   - जगदीश भोवड  मुंबईसारख्या शहरात लोकांना गंडा घालण्याचे, वाममार्गाने पैसे कमावण्याचे धंदे सातत्याने घडताना दिसत आहेत. यापैकी सर्वच गुन्ह्यांना वाचा फुटते असे नाही. आपण फसवले गेलो, आपली नाचक्की झाली, हे जगजाहीर होऊ नये यासाठी अनेक लोक आपल्यावर गुदरलेला प्रसंग पोलिसांना सांगतच नाहीत. त्यामुळे असे असंख्य गुन्हे उघडकीस येतच नाहीत. मात्र काही लोक पोलिसांकडे जाण्याचे धाडस करतात आणि पोलिसांनी मनावर घेतले, तर कोणताही गुन्हा उघड होतोच होतो, असाही अनुभव आहे. मुंबईमध्ये ‘युनिट नं. ९’ नावाची गुन्हे अन्वेषण विभागाची एक शाखा आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज पोलीस अधिकाºयांनी तपासी अधिकारी म्हणून काम करताना आपली छाप पाडली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनीही याच शाखेत असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. आता या युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते महेश देसाई. साळसकर यांच्याच तालमीत तयार झालेले महेश देसाई हेही आता आपली छाप पाडताना दिसत आहेत. मुंबईमध्ये विविध प्रकारची आ...